मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना शिरूर शहरात सर्वपक्षीयांकडून श्रद्धांजली!
शिरूरप्रतिनिधी :( सुदर्शन दरेकर)
26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई शहरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये शहीद झालेले पोलीस अधिकारी व निष्पाप नागरिक यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शिरूर शहरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पाकिस्तानातून समुद्रमार्गे आलेले आठ दहशतवादी मुंबई शहरात प्रवेश करून छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक व ताज हॉटेल या ठिकाणी अंदाधुंद गोळीबार करून निष्पाप नागरिकांचे बळी घेतले असंख्य नागरिकांना रेल्वे स्टेशनवर गोळीबार करून ठार करण्यात आले.
यावेळी मुंबई पोलिसांनी आपल्या जीवाची बाजी लावून मुंबई शहरामध्ये ठीक ठिकाणी नाकाबंदी करून दहशतवाद्यांना जिवंत पकडण्याचा प्रयत्न केला.
हेमंत करकरे, विजय साळसकर, अशोक कामठे, मेजर संदीप उन्नी कृष्णनन, तुकाराम ओंबळे हे अधिकारी शहीद झाले. देशाच्या आर्थिक राजधानीवर झालेल्या भ्याड हल्ल्याने संपूर्ण जगभरात हळहळ व्यक्त करण्यात आली. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 300 हून जास्त निष्पाप नागरिकांचे बळी गेले होते.
शहीद तुकाराम ओंबळे यांनी गिरगाव चौपाटीवर नाकाबंदी दरम्यान अजमल कसाब हा जिवंत पकडण्यात यश आले. त्यामुळे या कटाचा योग्य तपास करून अजमल कसाब याला फासावर लटकवण्यात न्याय यंत्रणेला यश आले.
या कार्यक्रमास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, आम्ही शिरूरकर फाउंडेशन चे बापू सानप, प्राध्यापक सतीश धुमाळ ज्येष्ठ पत्रकार, झाकीर खान पठाण अनिल बांडे सुनील जाधव, प्रकाश बाफना, डॉक्टर संतोष पोटे, मेहबूब सय्यद पुणे जिल्हा मनसे नेते, मायाताई गायकवाड मा. नगरसेविका शिरूर,ज्येष्ठ पत्रकार नितीन बारावकर,अभिजीत आंबेकर, मुकुंद ढोबळे फैजल पठाण, फिरोज शिकलकर आदी मान्यवर उपस्थित होते.

